spot_img
अहमदनगरमंत्री विखे यांनी आमदार थोरात यांना चांगलेच सुनावले! ‘ते’ वक्तव्य चर्चेत, पहा..

मंत्री विखे यांनी आमदार थोरात यांना चांगलेच सुनावले! ‘ते’ वक्तव्य चर्चेत, पहा..

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री-
मुठभर लोकांनी स्वतःच्या फायद्याकरिता काँग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेसमधील काही नेते स्वतःचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

बुथ अभियानाच्या सक्षमिकरण निमिताने तालुक्यातील आश्वी बुद्रुक, उमरी बाळापूर येथे मंत्री विखे पाटील यांनी बुथ प्रमुख तसेच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी संवाद साधला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ना. विखे पाटील म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकाला जोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांमध्ये केले. त्यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी उमेदवार कोण आहे यापेक्षा देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे यासाठी काम करा. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवा. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित काम करण्याचा संदेश त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

पुढे बोलतांना विखे पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी पक्षाचे प्राबल्य आहे अशा जागा सोडून द्यायचा स्वताच्या फायद्यासाठी नको तिथे उमेदवार देण्याचे काम राज्यातील कॉग्रेसी नेत्यांनी केले आहे. बाळासाहेब थोरात स्वताला जेष्ठ नेते समजतात पण थोरातांची आता किव येते कारण त्यांना स्वताच्या जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही. उत्तर महाराष्ट्रात ८ जागा असताना तिथे ही कॉग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यामुळे थोरातांनी काय काम केले? असा सवाल विखे पाटील यांनी केला.

नगर जिल्ह्यात कॉग्रेसला का जागा मिळाली नाही याची कारणे लोकांना आणि कार्यकर्त्यांना थोरातांनी सांगितली पाहिजेत असे थेट आव्हान देवून, सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणार्‍या थोरातांनी स्वताच्या नगर जिल्ह्यात पक्षाचे काय चालले आहे याकडे लक्ष द्यावे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी थोरातांना दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

पुणे नगर सहयाद्री:- अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती....

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...

अजबच! अहिल्यानगर जिल्ह्यात कुत्र्यावर गुन्हा दाखल?; नेमकं काय घडलं..

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात...

‘नाजूक’ संबंधामुळे संसाराला ‘तडा’! प्रियकराच्या मदतीने पतीला संपवल..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मिरजगाव (ता. कर्जत) येथे 10 जानेवारी रोजी एका 35-40 वर्षे...