मुंबई। नगर सहयाद्री-
काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठे खिंडार पडणार असल्याचा दावा करण्यात आला असून अशोक चव्हाण यांचा उजवा हात असलेला काँग्रेसचा बडा नेता पक्षाला रामराम ठोकणार आहे. यामुळे पुन्हा काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीच्या काळातच धक्का बसणार आहे.
काँग्रेस मधील मोठे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट शिंदे फडणवीस पवार सरकारम धीलन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा काय?
मी आदिवासी माणूस आहे कधीही खोटं बोलणार नाही. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांचा उजवा हात असलेले विजय वडेट्टीवार देखील लवकरच पक्षाला रामराम ठोकणार आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना राज्यसभेची जागाही मिळाली. त्यानंतर नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे भाजपमध्ये आले.