spot_img
अहमदनगरकाँग्रेसचा नगर शहर विधानसभेवर दावा; पहिला उमेदवारी अर्ज घेतला? वाचा सविस्तर..

काँग्रेसचा नगर शहर विधानसभेवर दावा; पहिला उमेदवारी अर्ज घेतला? वाचा सविस्तर..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीचे अर्ज मिळण्याची व भरण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.२२) सकाळ पासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज नगर तहसील येथील निवडणूक कार्यालयातून घेतले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शहराची जागा काँग्रेसलाच मिळेल असा दावा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी केला आहे.

२९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. ३० ऑक्टोबर रोजी छाननी तर ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे. काँग्रेसचे काळे यांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मनोज गुंदेचा म्हणाले की, जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. नगर दक्षिणेत सहा पैकी किमान एक जागा ही निश्चितपणे काँग्रेसला मिळणार असल्याचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. नगर शहरामध्ये काँग्रेस नेते किरण काळेंच्या रूपाने सक्षम उमेदवार महाविकास आघाडीकडे आहे. आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे. शहरात मतदारांना बदल हवा आहे. काळे निश्चित निवडून येतील अशी परिस्थिती आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, राज्यातील काँग्रेस पक्षश्रेष्ठी तसेच काँग्रेस हायकमांडने नगर शहराची जागा ही जागा वाटपात काँग्रेसला मिळावी यासाठी तिन्ही पक्षांच्या जागा वाटप समितीमध्ये आग्रह धरलेला आहे. बुधवारपर्यंत या बाबत शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. मविआतर्फे आम्ही शहराची जागा नगरकरांच्या पाठिंब्याने निश्चितपणे जिंकू असे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...