अहमदनगर / नगर सह्याद्री : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अहमदनगर शहराजवळ असताना मोठा गोंधळ उडाला. ते अकोळनेर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांच्या तफ्यासमोर मराठा आंदोलक आक्रमक झाले.
तेथे युवकांनी काळे झेंडे फडकवले. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी युवकांनी काळे झेंडे फडकवत नारायण राणे यांचा निषेध केला. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल केलेल्या टिकेमुळे मराठा समाज संतप्त झालेला आहे.
त्यामुळे नारायण राणे येणार असल्यामुळे सकाळपासूनच त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी मराठा आंदोलकांनी तयारी केली होती. मात्र पोलिसांनी नारायण राणे यांच्या हेलिकॉप्टर उतरण्याआधीच काही युवकांना ताब्यात घेतले होते. मात्र काही युवकांनी नगर पुणे रोडवरील शिल्पा गार्डन समोर नारायण राणे यांचा ताफा अकोळनेर येथे जात असताना त्यांच्या तफ्यासामोर काळे झेंडे फडकून निषेध केला.