spot_img
महाराष्ट्रऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी आ. सत्यजीत तांबेंची निवड

ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी आ. सत्यजीत तांबेंची निवड

spot_img

द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी महत्त्वाच व्यासपीठ / आ. तांबेंचा १७ ते २४ ऑगस्ट ऑस्ट्रेलिया अभ्यास दौरा

अहमदनगर / नगर सह्याद्री –
आगामी ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवाद (AIYD) ऑस्ट्रेलिया येथे होणार आहे. दोन्ही देशांतील तरुण नेत्यांच्या विचारचे आदान-प्रदानासाठी हा संवाद आयोजित करण्यात येत असतो. ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवाद ऑस्ट्रेलियात १७ ते २४ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या, AIYD ने दोन्ही देशांमधील या द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांतील तरुण नेत्यांना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांची निवड करण्यात आली आहे.

आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, शहरविकास अशा विविध मुद्दे मांडत असतात. या पूर्वी देखील अमेरिका व इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यासाठी आमदार सत्यजीत तांबेंची निवड झाली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियातील तरुणांमध्ये समज, सहयोग आणि स्थायी संबंध वाढवण्यासाठी AIYD हे एक व्यासपीठ महत्त्वाचे आहे. या संवादासाठी आ. तांबेंची निवड हे कौतुकास्पद आहे. प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील नेते दोन्ही देशांसमोरील आव्हाने आणि संधी शोधण्यासाठी एकत्र येतात असतात. आहे. AIYD हे एक व्यासपीठ आहे जे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या भविष्याला आकार देण्यासाठी महत्त्वाचे आहे. नेतृत्व, मुत्सद्दीपणा, नवकल्पना आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर लक्ष केंद्रित करून, हा कार्यक्रम सर्व सहभागींसाठी एक चांगले व्यासपीठ आहे.

ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या युवा संवादात, प्रतिनिधी लोकसंख्याशास्त्रीय बदलांपासून भविष्यातील उद्योगांपर्यंत, शेती आणि AI यासह संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या अडचणी आणि नवीन संधींसाठी दोन्ही देश कसे सहकार्य करू शकतात याचा शोध घेणार आहेत. या संवादामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ, विचारवंत आणि मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल चर्चा, कार्यशाळा आणि संवादात्मक सत्रे असणार आहेत.

ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी माझी निवड झाली आहे. माझ्यासाठी शिकण्याची ही खूप मोठी संधी आहे. या अभ्यास दौऱ्यात कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियाच्या संसदेत जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील शेतीकरी, स्टार्टअप करणाऱ्या आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद करता येणार आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मदत होणार आहे, असं आ. तांबे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

शहरप्रमुख काळेंचा संतप्त सवाल / राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत शहर ठाकरे सेनेने घेतली १४...

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...