नगरमध्ये भव्य शांतता रॅली । शिरूर, सुपा, केडगावमध्ये जंगी स्वागत
अहमदनगर / पारनेर । नगर सह्याद्री-
प्रचंड गर्दीत मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे नगरच्या वेशीवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सुपा चौकांत उपस्थित होते. यावेळी मराठा साजाच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन अन स्वागत केले. यावेळी महिला भगिनींची देखील लक्षणीय उपस्थिती होती. जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर मुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान यावेळी अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने हजारोंंच्या संख्येने केडगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे स्वागत करण्यात आले.
मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता रॅलीचे दुपारी नगर शहरात मराठा साजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. केडगाव येथील मराठा साजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत त्यांचे स्वागत केले. दरम्यान नगर शहरातील विविध चौकांत सकल मराठा साजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. दुपारी नगर शहरात शांतता रॅलीला सुरूवात झाली.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा साजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुण्याहून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नगरकडे प्रस्थान केले. या रॅलीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. बेलवंडी फाटा येथून त्यांनी नगरमध्ये प्रवेश केला. केडगाव येथे मराठा सामाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येत आले. मनोज जरांगे पाटील यांनी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शांतता रॅलीला सुरूवात झाली. रॅली माळीवाडा, पंचपीर चावडी, कापडबाजार, चितळे रोड ते चौपाटी कारंजा येथे रॅलीचा समारोप झाला. चौपाटी कारंजा येथे मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीला मार्गदर्शन केले.
दरम्यान मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शांतता रॅलीसाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक नेमले होते. रॅलीत सहभागी झालेल्या समाज बांधवाना जेवणांचे पाकिट, पाणी यांचे मोठ्या संख्याने वाटप करण्यात येत होते.
पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त
शांतता रॅलीसाठी 1 अपर पोलिस अधीक्षक, 3 उपअधीक्षक, 11 पोलिस निरीक्षक, 28 सहाय्यक व उपनिरिक्षक, 450 पोलिस कर्मचारी असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, सीसीटीव्ही व ड्रोन कॅेर्याद्वारे रॅली मार्ग व परिसरात वॉच ठेवण्यात आला आहे.