spot_img
अहमदनगरआमदार जगताप यांनी केली दिलगिरी व्यक्त, 'ते' कारण देखील आलं समोर…

आमदार जगताप यांनी केली दिलगिरी व्यक्त, ‘ते’ कारण देखील आलं समोर…

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरात रस्त्यांची कामे सुरू झाली असून पूर्ण होईपर्यंत काही दिवस नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल. अनेक वर्ष रस्त्यांच्या समस्येमुळे शहरवासीयांनी त्रास सहन केला आहे. रस्त्याची कामे होईपर्यंत थोड्या दिवस सहन करा. मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, विकास कामांमध्ये नगरकर मोठ्या संख्येने सहभागी होत असून विकासाची कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून लालटाकी, न्यू आर्ट्स कॉलेज, दिल्ली गेट पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आ.संग्राम जगताप, माजी नगरसेवक धनंजय जाधव, अमोल गाडे, प्राध्यापक अरविंद शिंदे, युवराज शिंदे, अनिल शेकटकर, अजय साळवे, डॉ.अभिजीत पाठक, प्राचार्य सागडे सर प्राचार्य तांबे सर, सुरज जाधव, सारंग पंधाडे, अंकुश मोहिते, पोपट पाथरे, शिवाजी साबळे, रवी दंडी, बाळकृष्ण जगधने, नितीन मरकड, यशवंत तोडमल, सनी कांबळे, सचिन भुतारे, बजरंग भूतारे, हरिभाऊ येलदंडी, चेतन अर्कल, परेश पुरोहित, आनंद पुंड, मदन पुरोहित, अनमल वाडेकर आदी उपस्थित होते

ढे बोलतांना आ जगताप म्हणाले, राज्य सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी एवढा मोठा निधी पहिल्यांदाच मिळाला असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहे. यानिमित्त भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त फिरत असताना नगरकर विकास कामांचे स्वागत करताना दिसत आहे त्यामुळे केलेल्या कामाचे समाधान मिळत असून या माध्यमातून ऊर्जा व प्रोत्साहन मिळते व अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार : विक्रमसिंह पाचपुते

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस...

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे....

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

कोपरगाव । नगर सहयाद्री:- शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी...

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि...