spot_img
ब्रेकिंगCM शिंदे यांचा नवा प्रस्ताव; भाजपचे नेते बुचकाळ्यात; शिवसेनेतील 'या' नेत्याला उपमुख्यमंत्री...

CM शिंदे यांचा नवा प्रस्ताव; भाजपचे नेते बुचकाळ्यात; शिवसेनेतील ‘या’ नेत्याला उपमुख्यमंत्री करा?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, पण आता मुख्यमंत्रीपदावरुन पेच झालाय. १३२ जागा जिंकणाऱ्या भाजपला मुख्यमंत्रीपद हवेय. तर सुरवातीला ५७ जागा असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही धरला होता.

त्यामुळे राज्याला नवा मुख्यमंत्री कोण मिळणार? याबाबत तक्र वितर्क लढवले जात आहे. १३७ आमदारांचे पाठबळ देवेंद्र फडणवीस यांना पाठबळ असल्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी देखील एक नवा प्रस्ताव महायुतीपुढे ठेवल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्त्तपत्राच्या वृत्तानुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे.

कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते बुचकाळ्यात पडले असून एकनाथ शिंदे यांच्या ऑफरबाबत आता भाजपच्या थिंक टँकमधील नेते काय निर्णय घेतात, हे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...