spot_img
अहमदनगरअहमदनगरच्या 'या' भागात ढगफुटी? अनेकांच्या घरात शिरले पाणी,काही गावांचा संपर्क तुटला...

अहमदनगरच्या ‘या’ भागात ढगफुटी? अनेकांच्या घरात शिरले पाणी,काही गावांचा संपर्क तुटला…

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
जामखेड परिसरात सायंकाळी सात वाजता झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर परिसराचा दोन तास संपर्क तुटला होता. तसेच परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तालुयातील दोन नंबरचा तलाव मोहरी कालच्या पावसाचे ओसंडून वाहू लागला. त्यामुळे कौतुकानदीला पुर आला होता, पैठण पंढरपूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच फक्राबाद येथील विचरणा नदीला पुर आल्याने धानोरा फक्राबाद पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

परिसरात सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची पीके पाण्याखाली गेले आहेत. पीके कोवळी असल्याने सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. साकत, खर्डा, मोहरी, दिघोळ, जातेगाव, जामखेड, फक्राबाद, धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने परीसरातील नद्यांना, ओढ्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक दिवसात जुलै महिन्यातच प्रथमच अनेक तलाव भरले आहेत तर नद्या. ओढ्यांना पूर आला आहे.
जामखेड शहरात कालच्या पावसाचे शिवाजीनगर व संभाजीनगर परिसराचा संपर्क तुटला होता.

कोणत्याच रस्त्याने या भागात जाण्यासाठी रस्ता नव्हता रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी वाहत होते. अनेकांना आपापल्या गाड्या बाहेरच लावून रात्री अकरा वाजता घरी जावे लागले. सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. गटाराचे काही ठिकाणी काम झाले आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. गटाराची साफसफाई नसल्याने अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली होती. त्यामुळे रस्त्यावर पाणी येत होते. बीड रोडवर पण सगळीकडे पाणीच पाणी होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...