spot_img
अहमदनगरस्वातंत्र्यापुर्वी सुरू झालेली अहमदनगर मधील 'ही' शाळा झाली बंद? कारण आलं समोर..

स्वातंत्र्यापुर्वी सुरू झालेली अहमदनगर मधील ‘ही’ शाळा झाली बंद? कारण आलं समोर..

spot_img

गणेश जगदाळे | पारनेर;-
स्वातंत्र्यापुर्वी सुरू झालेल्या पिंपरी पठार येथील जिल्हापरीषदेच्या शाळेत या वर्षी फक्त एकच मुलगी असल्याने या गावातील शाळा अता बंद झाली आहे. गावात खूप वर्षापासून ग्रामपंचायत सुद्धा आहे. मात्र गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत मुलेच नसल्याने ही शाळा आता या वर्षी बंद करण्यात आली आहे. वाडी वस्तीवरील शाळा मुलांअभावी बंद झाली तर त्यात फारसे विशेष असे काही नाही. मात्र गावपातळीवरील शाळा बंद होणे हे बाब खेदजनक आहे. अशी गावपातळीवरील शाळा बंद होण्याची कदाचित ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिलीच घटणा असावी.

पिंपरी पठार येथील जिल्हापरिषदेची शाळा स्वातंत्र्यापुर्वी म्हणजे १९४० साली सुरू झाली आहे. गावात ग्रामपंचायतही स्थापण होऊन सुमारे ७५ वर्षे होत आली आहेत. गावची लोकसंख्या सुमारे नऊशेच्या आसपास आहे. अशा गावातील या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. त्यातील अनेकजण मोठ्या पदावर सुद्धा आहेत. (कै.) जी आर पाटील हे रयत शिक्षण संस्थेच प्राचार्य होऊन गेले. आहेत. बाळासाहेब शिंदे यांनी दिल्ली येथे संरक्षण खात्यात तंत्रज्ञ म्हणून काम केले आहे. तर सध्या अनेकांनी व्यावसा़य बँका, कंपन्या तसेच शिक्षक म्हणूनही काम केले आहे तर काही करत आहेत.

तालुयात जिल्हा परिषदेच्या ३३४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये १४ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र तालुयातील पिंपरी पठार येथील शाळेत विद्यार्थीच नसल्याने ही शाळा या वर्षासाठी तरी बंद करण्यात आली आहे. ज्या गावात गेली अनेक वर्षापासून ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. अशा गावातील जिल्हा परिषदेची शाळा बंद होत आहे.ही अतीशय दुर्दैवी घटणा आहे.

तालुयात मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत. अशा शाळांची शिक्षण फी सुद्धा सर्वसामान्य पालकांना न परवडणारी असते. मात्र अशा शाळांकडे पालकांचा व मुलांचा कल वाढल्याने सरकारी जिल्हापरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. त्यामुळे तालुयातील पिंपरी पठार सह ब्रम्हणदरा, गणेशनगर या तीन शाळा बंद झाल्या आहेत. तर आणखी सहा ते सात शाळांमध्ये पाच पेक्षा कमी पट असल्याने त्याही बंद होण्या्च्या मार्गवर आहेत. या उलट तालुयात पिंपरी जलसेन, देविभोयरे,पानोली,पवारवाडी (सुपे), यासारख्या आदर्श व विद्यार्थी संख्या प्रमाणापेक्षा अधिक असलेल्या शाळाही आहेत.

चौकट-
खाजगी शाळेत शिक्षण घेणे परवडणारे नाही..
गावातील शाळा बंद होणे ही बाब अतीशय गंभीर आहे. या पुढील काळा आमच्या गावातील मुलांना शिक्षणासाठी शेजारील गावात दोन ते चार किलोमीटर अंतर चालून जावे लागणार आहे. गावातील अनेक मुले खाजगी इंग्रजी माध्यामाच्या शाळेत जात असल्याने येथे विद्यार्थी राहिले नाहीत. मात्र गोरगरीबांच्या मुलांना खाजगी शाळेत शिक्षण घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ती मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहे.
-शितल पागीरे, माजी सरपंच.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...