spot_img
अहमदनगरनगरकरांची उत्सुकता वाढली; रविवारी आमदार संग्राम जगताप मांडणार पुढचे व्हिजन...

नगरकरांची उत्सुकता वाढली; रविवारी आमदार संग्राम जगताप मांडणार पुढचे व्हिजन…

spot_img

आ. संग्राम जगताप मांडणार केलेल्या कामांचा लेखाजोखा व व्हिजन 29
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी शहरात गेली 5 वर्षात आमदारकी माध्यमातून केलेल्या कामांचा लेखाजोखा व भविष्यातील विकासाचे व्हिजन 29 उद्या रविवार दि.१७ ऑक्टोंबर २०२४ ला सायंकाळी ५ वाजता सहकार सभागृहात नगरकरांसमोर मांडणार आहेत. आपण शहरासाठी काय केले हे सांगतानाच पुढे काय करणार? हेही सांगणार असल्याने शहरवासियांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

नगर शहराचे नगरसेवक, महापौर आणि आमदार अशी चढती कमान क्रमाक्रमाने पार करताना ते शहराशी समरस झाले आहेत. शहरातील नागरी समस्या जवळून पहाताना त्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन ठोस उपाययोजना करताना ते नगरकरांना आपले वाटले. कोरोना महामारीच्याकाळात न घाबरता त्यांनी केलेली वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील तसेच प्रशासकीय कामकाजातील कामे त्यांच्या वेगळेपणाचा ठसा उमटवणारी ठरली.

गेल्या १० वर्षात शहर विकासाची केलेली कामे शहराच्या विकासाची पायाभरणीच ठरली असून पुढील पाच वर्षात करावयाच्या कामांचा व्हिजन २०२९ हा आराखडा आ. मांडणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...