spot_img
अहमदनगरगोड साखरेची पारनेरच्या आमदारांना मिरची..? 'यांनी' साधला 'लंके' यांच्यावर निशाणा

गोड साखरेची पारनेरच्या आमदारांना मिरची..? ‘यांनी’ साधला ‘लंके’ यांच्यावर निशाणा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच अहमदनगर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेत केलेल्या टीकेला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी प्रतीउत्तर देत निशाणा साधला आहे.

जिल्हाध्यक्ष भालसिंग म्हणाले, ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले. या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याची प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरिबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला.

सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेल्या कार्यामुळे कुणाच्या बुडाला मिरची लागण्याचे कोणतेही कारण नाही. पाच वर्षे ‘आपला माणूस’ म्हणुन मिडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले, हे जनतेला माहित आहे. गेल्या ५० वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो? याचे उत्तम उदारण समाजापुढे ठेवले आहे.

त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी कुणाला दिली नाही. पारनेरच्या आमदारांनी लोकांच्या पाणीप्रश्नाबाबात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला द्यावी. गरिबीचे भांडवल करून माध्यमांत आपली प्रतिमा उजळ करणाऱ्याना विकास काय कळणार? असा खोचक सवाल दिलीप भालसिंग यांनी विचारला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अर्ध्या तासात नवरी झाली विधवा, लग्न सोहळ्यात नेमकं काय घडलं?

अमरावती । नगर सहयाद्री:- अमरावती मधील वरुड तालुक्यातील पुसला गावात आनंदाचा लग्नसोहळा काही क्षणातच...

सभापती राम शिंदे अन् आमदार रोहित पवारांचा संघर्ष पेटणार; कार्यकर्त्यावर होणार विशेषाधिकार भंगाची कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधान परिषद सदस्यांविषयी...

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ! ‘बड्या’ नेत्याचे अपहरण अन् मारहाण, VIDEO आला समोर..

श्रीरामपूर। नगर सहयाद्री:- अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे...

निवडणूकीचा प्रचारात राडा! काँग्रेस नेत्याचा भयंकर प्रताप; भाजपचा प्रचार करणाऱ्या…

Political News: नागपूरमध्ये कळमेश्वर निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना आरिफ शेख...