spot_img
अहमदनगरतीन लाखांची रोकड लंपास; अहमदनगरमध्ये शेतकर्‍यासोबत घडलं असं काही..

तीन लाखांची रोकड लंपास; अहमदनगरमध्ये शेतकर्‍यासोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शेतकर्‍याने बँकेतून काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सावेडी उपनगरातील वसंत टेकडी परिसरात सोमवारी (२ सप्टेंबर) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी शिवाजी लक्ष्मण तांबे (वय ६४, रा. वीर सावरकर मार्ग, वसंती टेकडी, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे सोमवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच-१६-डीडी-२९६६) घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुलमोहोर रोड शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेच्या बाहेर मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची दुचाकी पार्क केली व ते बँकेत गेले. १५ मिनिटांनी ते बँकेतून बाहेर आले व बँकेतून काढलेली तीन लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. दुचाकी घेऊन ते घराकडे जात असताना वीर सावरकर मार्गावर महेश किराणा दुकानासमोर किराणा घेण्यासाठी थांबले.

तेथे किराणा सामान घेऊन ते घरी गेल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली रक्कम त्यांना दिसली नाही. त्यांनी रोकड कुठे गेली, याचा शोध घेतला परंतु त्यांना ती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत रोकड चोरीला गेल्याची माहिती दिली. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनास्थळी भेट दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी केली असून संशयित चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय, कोणाचा फायदा, कोणाला झटका?

मुंबई / नगर सह्याद्री - एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची...

प्रतिक्षा संपणार? आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल…

मुंबई / नगर सह्याद्री राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी...

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...