spot_img
ब्रेकिंगAllu Arjun News: 'पुष्पराज' वर गुन्हा दाखल! कारण काय? वाचा सविस्तर

Allu Arjun News: ‘पुष्पराज’ वर गुन्हा दाखल! कारण काय? वाचा सविस्तर

spot_img

Allu Arjun News: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक, आंध्र प्रदेशमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी अभिनेता त्याच्या आमदार मित्राला भेटायला आला होता, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अल्लू अर्जुन 11 मे रोजी आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे वायएसआरसीपी आमदार रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या प्रचारासाठी गेला असता त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती.

अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा रेड्डी, सिल्पा रवी आणि आमदार कुटुंबीयांसह बाल्कनीत चाहत्यांना भेटण्यासाठी आले होते. अल्लू अर्जुनने बाल्कनीतून हस्तांदोलन करत चाहत्यांची भेट घेतली.

लोक मोठ्याने पुष्पा, पुष्पाच्या घोषणा देत होते. मात्र अल्लू अर्जुन यांना कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय निमंत्रित केले होते, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी निवडणुका आहेत. सिल्पा रवी (सिंगारेड्डी रवीनचद्र किशोर रेड्डी) 13 मे रोजी सत्ताधारी पक्षाची उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या घरी जाणे आणि त्यांच्या घराबाहेर गर्दी जमवणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. या प्रकरणी आमदार आणि अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...