spot_img
अहमदनगरपारनेर-नगर मतदारसंघातील दबंगगिरी गाडून टाका; आ. काशिनाथ दाते यांचा खा. निलेश लंके...

पारनेर-नगर मतदारसंघातील दबंगगिरी गाडून टाका; आ. काशिनाथ दाते यांचा खा. निलेश लंके यांच्यावर घणाघात

spot_img

अकोळनेर येथे आमदार दाते यांचा नागरी सत्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
पारनेर नगर मतदार संघात पाच वर्षापासून चाललेल्या दंबगगिरीला नागरिक कंटाळले होते. हिच दंबगगिरी आता मुळासकट उपटून फेकून द्यायची आहे. विधानसभेत जशी जागा दाखविली तसे येणाऱ्या लोकसभेत करायचे आहे. वाईट प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीपासून तरुणांनी सावध रहावे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना थारा देऊ नका, दबंगगिरी करणाऱ्यां लोकांना गाडून टाका असा खरपूस समाचार आमदार काशीनाथ दाते यांनी खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता घेतला.

अकोळनेर (ता. नगर) येथे नवनिर्वाचित पारनेर नगर मतदार संघाचे आमदार काशीनाथ दाते यांचा सत्कार चा कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी ते बोलत होता. या कार्यक्रमासाठी सरपंच प्रतीक शेळके, रमेश जाधव, सुनील उमाप, राजेंद्र शेळके, भाऊ भोर, बाबासाहेब जाधव, आप्पासाहेब सप्रे, संजीव भोर, वसंत चेडे, अशोक झरेकर, काशिनाथ चोभे, राजेंद्र कोतकर, मारुती, भाऊसाहेब जऱ्हाड, दादाभाऊ चितळकर, अरुण होळकर, नाना बोरकर, सागर सप्रे, विक्रम कळमकर, पोपटराव घुंगार्डे यावेळी उपस्थित होते.

यावेळी आ. दाते म्हणाले नगर तालुक्यात माझा संपर्क कमी होता. मात्र माझ्या राजकारणाची चाळीस वर्षाची यशस्वी वाटचाल होती. पारनेर तालुक्यात सर्वाधिक निवडणुक केल्या. त्यामध्ये यश मिळवल. नगर तालुक्यात माजी खासदार सुजय विखे पाटील, आ. शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जिवाचे रान केले. मला प्रचाराला फक्त बारा दिवस मिळाले. पारनेर प्रमाणे नगर तालुक्याने साथ दिली. पारनेर मतदार संघातील नागरिक लोकप्रतिनिधीच्या दंबगगिरीला कंटाळले आहे. पाच वर्षात तरुणांचा भ्रमनिरास झाला. एमआयडिसीमध्ये एकाही तरुणाला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. हे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पहायला निघाले होते. यांना पक्षाचे काहीच घेणे देणे नाही. लंके प्रतिष्ठान राज्यात मोठे करायचे आहे असे आ. दाते म्हणाले.

माजी आमदार नीलेश लंके यांनी अकोळनेर गाव दत्तक घेतले होते. मात्र कुठल्याही प्रकारचे काम केले नाही. आमच्या गावाने मागील निवडणुकीत लिड दिले म्हणून निवडून आले. मात्र या निवडणूकीत आम्ही त्यांचा पराभव केला. केडगाव घोसपुरी रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याचा प्रश्न आमदार काशीनाथ दाते यांनी प्रथम माग लावावा असे सरपंच प्रतिक शेळके म्हणाले. या कार्यक्रमासाठी गोरख जाधव, अर्जुन सोनवणे, नारायण राऊत, रघुनाथ हजारे, सुनिल फाटक, संजय जाधव, अरुण दिवटे, दादा धस, बापु मेहत्रे, मारूती मेहत्रे सह नागरिक उपस्थित होते.

पाच वर्षात कार्यक्रम झाला
मी दहावे, अंत्यविधी वाढदिवसाला जातो. मात्र त्याचे कधीच फोटोसेशन करत नाहीत. मात्र गेल्या पाच वर्षात प्रसिद्धीचा नवीन फंडा आला आहे. दुखः घटनेची हि प्रासिद्धी केली जाते, असे लोकप्रतिनिधी जन्माला आले. त्यांचा पाच वर्षाचा कार्यक्रम विधानसभेच्या निवडणुकीत केला. हा कार्यक्रम लोकसभेला व्हायला पहिजे होता असे आ. दाते म्हणाले.

नगर तालुक्याकडे जास्त लक्ष देणार
निवडून आल्यावर दुसऱ्याच दिवशी विधानभवनात जाणारा पहिला आमदार आहे. विधानभवनात अजित पवार यांची भेट घेऊन पारनेर मतदार संघात विकास कामाबाबत चर्चा केली. आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मार्च मध्ये अर्थसंकल्प असतो. तेव्हा आपल्या भागातील कामाचे निवेदन तातडीने माझ्याकडे पोहच करा. अर्थसंकल्पात सादर करता येईल.नगर तालुक्यात 43 गावात जास्त लक्ष राहणार आहे. केडगाव ते घोसपुरी रस्ता चे काम प्रथम माग लावणार असल्याचे यावेळी आ. काशिनाथ दाते यांनी सांगीतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा संपली आता मनपा, झेडपी! मतदारयादी, प्रभाग, गट, गण फेररचनेकडे सर्वांचे लक्ष

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- लोकसभा निवडणुकीपाठोपाठ नुकतीच विधानसभा निवडणूकही संपली आहे. त्यामुळे गाव, तालुका व...

अखेर ठरलं! अधिकृत घोषणा बाकी! पटोलेंचे निवडणूक आयोगाला भलतेच पत्र

मुंबई / नगर सह्याद्री राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत जवळपास निर्णय झाले आहेत. याविषयी...

अण्णा झोपले; बाबांचे आत्मक्लेष! खा. संजय राऊत यांनी साधला निशाणा

मुंबई | नगर सह्याद्री:- आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने 200 पेक्षा अधिक जागा...

मंत्रीमंडळ लांबणीवर..! कारण काय? वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या...