spot_img
अहमदनगरब्रेकिंग : जायकवाडीत पाणी सोडण्याच्या प्रक्रियेस सुरवात ! अनेक ठिकाणी जमावबंदी, 'असे'...

ब्रेकिंग : जायकवाडीत पाणी सोडण्याच्या प्रक्रियेस सुरवात ! अनेक ठिकाणी जमावबंदी, ‘असे’ केलेय नियोजन

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : जायकवाडीला पाणी सोडण्याचा वाद नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे. पाणी सोडू नये यासाठी दोन्ही जिल्ह्यातून विरोध होत आहे. परंतु असे असताना आता एक महत्वाची बातमी आली आहे. पैठण धरणामध्ये भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने तयारी देखील सुरु झाली आहे.

जमावबंदी
ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. प्रवरानदीवर येणाऱ्या रामपूर, केसापूर, मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर आदी कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केलेत. हे 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश समर आहेत. श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी हे आदेश दिलेले आहेत.

अनुचित कृतींवर बसणार चाप
हे पाणी सोडल्यानंतर लाभक्षेत्रातील परिसरांत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विविध नियोजन केले आहे. तसेच पैठण धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी फळया (बर्गे) काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवाह कालावधीत लाभधारकांकडून अनिधकृत पाणी उपसा होऊ शकतो, तेथे नेमलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्‍यांना दमदाटी, मारहाण असले अनुचित प्रकार घडण्याचेही शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टींना चाप बसावा यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लावले आहेत.

या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येणे असे चालणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी निर्बंध असणार असल्याचे आदेशात सांगितले गेले आहे. त्यामुळे आता या परिसर अनुचित प्रकार होणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

मुंबई | नगर सह्याद्री आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने...

Ahmednagar Crime: धक्कादायक! केसेस करता म्हणून दिव्यांगाला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर। नगर सहयाद्री केसेस करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला....

Accident News: पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये कारचालकाने तिघांना उडवलं!

नागपूर । नगर सहयाद्री- पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना...

Ahmednagar Crime: लिफ्ट देण्याच्या बहाणा,अन भलताच कुटाणा? नगरच्या युवका सोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच,...