पुणे | नगर सह्याद्री
कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर शुक्रवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. कोथरूड परिसरात शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या.
यामध्ये शरद मोहोळ गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मोहोळ याच्यावर हा जीवघेणा हल्ला एखाद्या टोळीने किंवा अन्य कोणी व्यक्तीने केला, याबाबत अद्याप तपशील समोर आला नाही.
पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. ही घटना नेमकी कशी घडली, हेदेखील अद्याप समोर आलेले नाही. शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे.
त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक केली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला होता.