spot_img
ब्रेकिंगकोण कोणामुळे निवडून आले? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच म्हणाले, निवडून येणार्‍याला..

कोण कोणामुळे निवडून आले? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच म्हणाले, निवडून येणार्‍याला..

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
राष्ट्रवादीचे नेत्या सुप्रिया सुळे व शिरूरचे खा. अमोल कोल्हे हे दोघे अजित पवारांमुळे निवडून आल्याची चर्चा सध्या गाजत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, निवडून येणार्‍याला माहितीय कोण कोणामुळे निवडून आले अन् निवडून आणणार्‍यालाही माहितीय कोण कोणामुळे निवडून आले, असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, राज्य मागासवर्गीय आयोग हे स्वायत्त आहे आणि त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. आम्ही हस्तक्षेप करत नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी होते, असे विधान केले होते. त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

‘अजित पवार पक्षात असताना दमदाटी करत होते’ या आव्हाड यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. सकाळी सहाला कामाला सुरूवात करतो. मी असले आलतू-फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही. किरकोळ किरकोळ प्रश्न ज्याला काही अर्थ नाही, दोन दिवस चघळायचे-चघळायचे अन त्याचा चोथा करायचा.

राज्यात कोविड वाढू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. मागील वेळेस सगळ्यांनी कर्तव्य बजावत सहकार्य केले होते. आताच्या कोविडमध्ये तीव्रता फार नाही. आम्ही अजून मास्क वापरायला सुरुवात केली नाही. आम्ही पण मास्क वापरला पाहिजे ते सत्य आहे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....