spot_img
ब्रेकिंगAhmednagar: नगरमध्ये पत्रकार दिनाचे आयोजन; ‘नगर सह्याद्री’चे सुनिल चोभे यांना पुरस्कार

Ahmednagar: नगरमध्ये पत्रकार दिनाचे आयोजन; ‘नगर सह्याद्री’चे सुनिल चोभे यांना पुरस्कार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर प्रेस लब तथा अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (दि. ६) पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर महापालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सकाळी १० वाजता होणार्‍या या कार्यक्रमास पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी केले आहे. यावेळी ‘नगर सह्याद्री’चे निवासी संपादक सुनील चोभे यांना बेस्ट रिपोर्टर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पत्रकार दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार संघाच्या वतीने बेस्ट रिपोर्टर ऑफ द इयर २०२३ पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी निवड झालेल्या पत्रकारांना मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या पत्रकारांमध्ये चंद्रकांत शेळके (लोकमत), श्रीकांत राऊत (सकाळ), महेश देशपांडे (्पुण्यनगरी), सचिन दसपुते (सार्वमत), गोरक्ष दळवी (पुढारी), दीपक कांबळे (दिव्य मराठी), जयंत कुलकर्णी (प्रभात), सुनील चोभे (नगर सह्याद्री), भाऊसाहेब होळकर (समाचार), कुणाल जायकर (इलेटॉनिक मिडीया), बाळकृष्ण गारडे (मराठवाडा केसरी) यांचा समावेश आहे. तसेच स्व. भास्करराव डिक्कर स्मृती पत्रकारिता पुरस्काराने रियाज शेख (साप्ताहिक दर्शक) यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर कराळे व अण्णासाहेब नवथर यांनी सांगितले.

आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला आणि महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. याच कार्यक्रमात पदोन्नती व अन्य विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीराम जोशी (नगर टाईम्स), दीपक रोकडे (पुढारी), दत्ता इंगळे (प्रेस फोटोग्राफर, सकाळ), डॉ. सुर्यकांत वरकड (पुढारी) यांचाही मानचिन्ह देऊन सन्मान केला जाणार असल्याचे संघाचे सचिव शिवाजी शिर्के यांनी सांगितले.

स्व. महेंद्र कुलकर्णी स्मृती पत्रकारितापुरस्करांचेही होणार वितरण

ज्येष्ठ पत्रकार व दैनिक समाचारचे मालक, संपादक स्व. महेंद्र कुलकर्णी यांचे पत्रकारिता क्षेत्रात मोठे योगदान राहिले. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात या उद्देशाने अहमदनगर महापालिकेच्या वतीने त्यांच्या नावाने जीवन गौरव आणि उत्कृट बातमीदार असे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांना स्व. महेंद्र कुलकर्णी जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच स्व. महेंद्र कुलकर्णी उत्कृष्ट बातमीदार पुरस्कार लोकसत्ताचे मोहिनीराज लहाडे यांना जाहीर झाला असून ३१ हजार रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे दोन्ही पुरस्कार अहमदनगर महापालिकेने सुरु केले असून दरवर्षी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम...

मोठी बातमी ! मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंकडून आज मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे...

रजनीकांत 24 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये धमाका करणार ! ‘या’ सिनेमात झळकणार

मुंबई / नगर सहयाद्री : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा दिग्गज अभिनेता हा त्याच्या वैविध्यपूर्ण...

अभिनेत्री जया प्रदा का आहे फरार? नेमक्या कोणत्या प्रकरणात अडकल्यात? पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : अभिनेत्री जया प्रदा हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव. त्यांनी...