spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर ईडीची धाड

ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर ईडीची धाड

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
‘उबाठा’चे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी धाड टाकली आहे. ईडीच्या पथकात १० ते १२ अधिकार्‍यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने वायकर यांच्या घरी धाड टाकल्याचे सांगितले जाते. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक रवींद्र वायकर यांच्या घरी पोहोचले आणि झाडाझडती सुरू केली. तसेच वायकर यांच्या संबंधित सात ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली आहे.

याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे आणि त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर, अनिल परब, संजय राऊत यांनी कोरोनात फक्त कमाई करण्याचे पाप केले. जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरे यांनी गैरमार्गाने रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी येथे २ लाख स्क्वेअर फूटांचे अनधिकृत हॉटेल बांधण्याची परवानगी दिली.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रकरण दाबले. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे पार्टनर आहेत. अलिबागमधील १९ बंगल्यांचा घोटाळाही रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांनी संगनमताने केला आहे. नोटंबदीतही वायकर यांनी हात धुवून घेतला होता. हिशोब तर द्यावा लागणार, असेही सोमय्या म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...