spot_img
अहमदनगरAhmednagar News: नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको! काय केली मागणी पहाच..

Ahmednagar News: नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको! काय केली मागणी पहाच..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तन सोडावे या मागणीसाठी शुक्रवार दि. १७ मे रोजी नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पाण्याअभावी पिके करपण्याची भिती व्यक्त केली. शेतीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांनी राहुरी येथे एकत्र येत नगर मनमाड महामार्ग अडवला. यावेळी आंदोलकांनी निवडणुका संपल्या त्यामुळे नेते मंडळी आता गावांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. जनावरांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतक-यांना सरकारने वार्‍यावर सोडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....

शहर हादरलं! सरफिऱ्या पतीचे धक्कादायक कृत्य, चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळला..

Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...