spot_img
ब्रेकिंगसावधान! पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, हवामान खात्याचा नवा अंदाज काय? पहा..

सावधान! पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, हवामान खात्याचा नवा अंदाज काय? पहा..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
पुढील पाच दिवस शुक्रवार १७ मे ते मंगळवार २१ मे दरम्यान राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात उष्ण वारे वाहण्याची शयता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सध्या देशातील अनेक भाग उष्णतेने त्रस्त आहेत. राजधानी दिल्लीत गुरुवारी या हंगामातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली.

गुरुवारी दिल्लीत कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंश सेल्सिअस जास्त आहे. शुक्रवारी देशातील अनेक भागात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. तर शनिवारी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते असे देखील भारतीय हवामान विभागाकडून दिलेल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१६) देशात अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअस ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत होते. विशेषतः राजस्थानच्या बहुतांश भागात, दक्षिण हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. हे सामान्य तापमानापेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअस जास्त आहे, असे देखील हवामान खात्याने म्हटले आहे.

पुढील पाच दिवस १७ मे ते २१ मे दरम्यान राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात, १८ मे ते २१ मेमध्ये उत्तर मध्य प्रदेशात, १८ ते २१ मे दरम्यान पश्चिम राजस्थान, पंजाब आणि हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात प्राणघातक उष्णतेची लाट येण्याची शयता आहे.

तर उप-हिमालयीन भागात आणि पश्चिम बंगालमध्ये १७ मे रोजी आर्द्रता आणि उष्णतेमुळे लोक त्रस्त होतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शयता आहे. तसेच आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार पावसाची शयता व्यक्त केली आहे.

या जिल्ह्यात पावसाची शयता
जळगाव, नाशिकमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शयता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वार्‍यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये हलया ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शयता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (५०-६० किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शयता आहे. तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शयता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...