अहमदनगर | नगर सह्याद्री
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तन सोडावे या मागणीसाठी शुक्रवार दि. १७ मे रोजी नगर जिल्ह्यातील शेतकर्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांनी पाण्याअभावी पिके करपण्याची भिती व्यक्त केली. शेतीच्या पाण्यासाठी शेतकर्यांनी राहुरी येथे एकत्र येत नगर मनमाड महामार्ग अडवला. यावेळी आंदोलकांनी निवडणुका संपल्या त्यामुळे नेते मंडळी आता गावांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. जनावरांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतक-यांना सरकारने वार्यावर सोडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.