अहमदनगर | नगर सह्याद्री-
कोळसा खरेदीसाठी दिलेले दोन लाख ३५ हजार रूपये घेऊन कामगार पसार झाल्याने व्यावसायिकाची फसवणूक झाली. व्यावसायिक किशोर बाळासाहेब जाधव (वय ३१ रा. अकोळनेर ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामगार राजू बाळासाहेब पावणे (रा. भिगवण स्टेशन, इंदापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास घडली.
किशोर जाधव व्यावसायिक असून त्यांच्याकडे राजू बाळासाहेब पावणे हा चालक म्हणून काम करतो. जाधव यांनी पावणे याच्याकडे मंगळवारी सकाळी कोळसा खरेदीसाठी विश्वासाने दोन लाख ३५ हजार रूपये दिले होते.
पावणे याने त्या पैशाचा कोळसा खेरदी न करता तो पैसे घेऊन गायब झाला. जाधव यांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासोबत संपर्क झाला नाही. त्यानंतर जाधव यांनी नगर तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पावणे विरोधात गुन्हा दाखल केला.