spot_img
ब्रेकिंगAhmednagar News Today:निघोज ग्रामस्थांकडून ‘नगर सह्याद्री’ दिनदर्शिकेचे जोरदार स्वागत

Ahmednagar News Today:निघोज ग्रामस्थांकडून ‘नगर सह्याद्री’ दिनदर्शिकेचे जोरदार स्वागत

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
नगर सह्याद्री दिनदर्शिकेची सर्वाधिक मागणी होत असून निघोज व परिसरात तसेच पारनेर तालुक्यातील घरोघरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी, महत्वपूर्ण कार्यालये या ठिकाणी नगर सह्याद्री दिनदर्शिका गेली असून निघोज ग्रामस्थांनी वर्षभराचे सण, उस्तव,तिथी परिपुर्ण पंचाग असा माहितीचा खजाणा असणार्‍या ’नगर सह्याद्री’ दिनदर्शिकेचे राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा मंदीराजवळ जोरदार स्वागत करण्यात आले.

माजी सरपंच व निघोज कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसरपंच माऊली उर्फ ज्ञानेश्वर वरखडे, शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, चेअरमन चंद्रकांत लंके, व्हा.चेअरमन दत्तात्रय गुंड, अमृताशेठ रसाळ, डी बी लाळगे कंट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय लाळगे, माजी चेअरमन रामदास वरखडे, सेवानिवृत्त अधिकारी पोपटराव कवाद, कन्हैया ज्वेलर्सचे संस्थापक मुकुंदराव निघोजकर, निघोज सोसायटीचे अध्यक्ष सुनिल वराळ, उपाध्यक्ष शांताराम लाळगे, मयुरशेठ गुगळे, सुदर्शन निघोजकर, प्राध्यापक लामखडे, दिलीप उनवणे, सतीश साळवे, ज्येष्ठ ग्रामस्थ सुरेश दादा खाडे, अरुण खोबरे, मुकुंदराव वराळ, मंगेश वराळ, सुनिल उचाळे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष योगेश खाडे, पत्रकार संदीप ईधाटे, प्रगतीशील शेतकरी विठ्ठलराव लंके, माजी विश्वस्त नानापाटील लंके, तंटामुक्तीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, मळगंगा पतसंस्थेंचे उपाध्यक्ष रामदास लंके, माजी संचालक बजरंग वराळ, बालाजी दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुणशेठ लंके, साई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष मंगेशशेठ लंके, मुंबई येथील व्यवसायीक विष्णूशेठ कदम, राजमुद्रा कंट्रक्शनचे अध्यक्ष बाबाजी लंके, माजी ग्रामपंचायत सदस्य भास्करराव वराळ, गजानन ठुबे, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल, फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारी रोहित लाळगे, पैलवान आनंदा वराळ, ज्येष्ठ ग्रामस्थ नाना पावडे, लामखडे भावकीचे कारभारी हरिभाऊ लामखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे शंकरराव लामखडे, कांद्याचे व्यापारी संतोषशेठ रसाळ, मळगंगा पतसंस्थेंचे संचालक अविनाश भांबरे, रेवजी लंके, बबनराव लामखडे, महादेव कवाद, विद्याधन शिक्षण समुहाचे प्राध्यापक डोके, आपलं गाव गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि रणसिंग, मार्गदर्शक भास्करराव सोनवणे, लतीफभाई तांबोळी, अस्लमभाई इनामदार, रवि लंके, आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ व नगर सह्याद्री वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वितरण कार्यक्रमानंतर आलेल्या मान्यवरांनी या वेळी नगर सह्याद्रीच्या दिनदर्शिकेचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे यांनी करीत उपस्थितांचे आभार मानले.

नगर सह्याद्री माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय
नगर सह्याद्रीने सर्वसामान्य जनतेला न्याय देताना जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढीत जनतेच्या मनात आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. सर्वसामान्य जनतेला खर्‍या अर्थाने आधार देण्याचे काम नगर सह्याद्रीने केले आहे, जनतेचे व्यासपीठ म्हणून गेली दहा वर्षे वृत्तपत्र म्हणून काम करताना राजकारणातील दिग्गजांची पर्वा न करता सत्य लिखाण प्रसिद्ध करुण ढोंगी राजकारण्यांचे बुरखा फाडण्याचे काम केले आहे. एक परिपूर्ण दिनदर्शिका देउन त्यांनी धार्मिक संस्कृतीला चालना देण्याचे काम केले आहे.
-सचिन वराळ पाटील अध्यक्ष, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन

नगर सह्याद्रीचा जिल्ह्यात नावलौकिक
व्यवसायाची खर्‍या अर्थाने प्रसिद्धी करण्याचे काम नगर सह्याद्री माध्यमातून होत असते. एक परिपूर्ण दैनिक म्हणून नगर सह्याद्रीने जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. एक परिपूर्ण दिनदर्शिका देउन ३६५ दिवस जनतेबरोबर ही चांगली प्रतीमा तयार झाली आहे.
-मुकुंदराव निघोजकर ( संस्थापक, कन्हैया ज्वेलर्स)

नगर सह्याद्री माध्यमातून शेतकर्‍यांना पाठबळ
नगर सह्याद्री माध्यमातून शेतकर्‍यांना पाठबळ देण्याचे काम होत असून आज शेतकरी अडचणीत सापडला असून केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची गरज आहे. यासाठी नगर सह्याद्रीने वेळोवेळी आवाज उठवला असून नगर सह्याद्री दिनदर्शिका माहितीपुर्ण आहे.
-माजी सरपंच चंद्रकांत लामखडे

सारीपाटाच्या माध्यमातून लोकजागृती
समाजाभिमुख विकासकामांना पाठबळ देण्याचे काम नगर सह्याद्रीने मोठ्या प्रमाणात केले असून परखड विचार व सारीपाट माध्यमातून लोकजागृती केली आहे. दिनदर्शिका वाचनीय आहे. उपसरपंच माऊली उर्फ ज्ञानेश्वर वरखडे. मराठा आरक्षण असो की छत्रपतींचे विचार तसेच अल्पसंख्याक समाजाविषयी तळमळ हे प्रश्न सातत्याने नगर सह्याद्रीने मांडीत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भुमिका नगर सह्याद्रीने घेतली आहे.
-शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद

विकासाभिमुख कामांना पाठबळ
वकासाभिमुख कामांना पाठबळ देणारे आणी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी खर्‍या अर्थाने नगर सह्याद्रीने दहा वर्षात मोठे काम केले नगर जिल्ह्याचा नावलौकिक राज्यात करीत सारीपाट माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची भुमिका घेउन एक सामाजिक कामांचा वसा नगर सह्याद्रीने घेतला आहे एक परिपूर्ण दिनदर्शिका देउन जनतेच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे .
-अस्लमभाई इनामदार ( प्रवक्ते संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...