spot_img
ब्रेकिंगविधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लान; नगर विधानसभेवर ठोकला दावा

विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लान; नगर विधानसभेवर ठोकला दावा

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपाने मोठी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. केवळ ३ महिन्यांचाच कालावधी शिल्लक राहिल्यामुळे
निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी नगर शहरात मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यातच आता महायुती मधील मोठा भाऊ असलेल्या भाजपाने देखील नगर शहर मतदार संघावर दाव ठोकला आहे. शहर भाजपाच्या बैठकीत नगर शहर मतदारसंघा भाजपाकडे घ्यावा असा ठराव बैठकीत करण्यात आला आहे.

नगर शहरातील भाजप कार्यालयात प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच पार पडली. शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली, या बैठकीला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारी सदस्य प्रा.भानुदास बेरड, प्रदेश कार्यकारी सदस्या वसंत लोढा, नरेंद्र कुलकर्णी, महेश नामदे, सचिन पारखी, प्रशांत मुथ्था, पंडित वाघमारे, सविता कोटा, अजय चितळे, गोपाल वर्मा, बाळासाहेब भुजबळ, बाबा सानप, सुनील तावरे, गीता गिल्डा, कालिंदी केसकर, सुरेखा जंगम, राखी आहेर, राजू वाडेकर, अमोल निस्ताने, लक्ष्मीकांत तिवारी, बाळासाहेब खताडे, राजाभाऊ विद्ये, विलास नंदी, महेश गुगळे, महेश हेडा, करण डापसे, ज्ञानेश्वर धिरडे, संतोष गांधी, राज शेलार, महावीर कांकरिया आदी उपस्थित होते.

या बैठकीत विविध विषयांवर पक्षांतर्गत चर्चा करण्यात आली. विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी नगर शहर मतदारसंघ हा भाजपाकडे घ्यावा असा ठराव यावेळी मांडला. यावर अनेकांनी ठरावाच्या बाजूने भाष्य केले आहे. या ठरावाला माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमुखाने हा ठराव मंजूर करण्यात आला.

दरम्यान यावेळी राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना सर्वसमान्य लोकापर्यंत पोहचविण्याबाबत आवाहन प्रा.बेरड यांनी केले. ते म्हणाले, महिलाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मोठी मदत होणार आहे. या योजनेमुळे कुटुंबाला हातभार लावता येणार आहे. यामुळे महिलाचे सक्षमीकरणासाठी पाठबळ मिळेल, अशा विविध योजना सर्वसामान्यापर्यत पोहचवा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे..

विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लान
महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपने मास्टर प्लान आखत महाराष्ट्रात लवकरच भाजपची जनसंवाद यात्रा सुरू करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.यात्रेत भाजपचे केंद्र आणि राज्यातील तब्बल १९ नेते सहभागी होणार आहे. यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याचा महायुतीचा मानस आहे. येत्या २१ जुलै रोजी पुण्यामध्ये राज्यातील ५ हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन होणार आहे.अधिवेशनमध्ये भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख ठरणार असल्याचं देखील त्यांनी सांगीतले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढचे ५ दिवस महत्वाचे, पावसाचा जोर वाढणर; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढचे पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने...

नगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या...

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...