spot_img
अहमदनगरअहमदनगरसह शिर्डी पण भाजपा जिंकणार! मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

अहमदनगरसह शिर्डी पण भाजपा जिंकणार! मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

spot_img

लोणी | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती साध्य केली आहे. आता पुन्हा एकदा देशाला विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे. देशातील चारशे जागा जिंकताना नगर जिल्ह्यातील दोन जागांचाही समावेश यामध्ये राहील असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यत केला.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी आज दाढ बुद्रूक, दुर्गापुर, हसनापूर, या गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला. विविध ठिकाणी झालेल्या बैठकांमधून ना. विखे पाटील यांनी केंद्र सरकारने मागील दहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहीती देवून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या वाटचालीचा आढावा घेतला.सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या मंत्राने नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात योजनांवर काम सुरु केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून त्यांनी सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले काम हे देशातील जनतेला सामाजिक न्याय देणारे ठरले आहे. यापुर्वी काँग्रेसचेही सरकार देशात आणि राज्यात होते. परंतू त्यांनी कधीही सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत.आज भारत देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून, जगामध्ये ओळखले जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे.

येणा-या काळात तीस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश म्हणून भारत देश ओळखला जाईल असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत देश काम करीत आहे. आघाडी सरकारचे अडीच वर्षे आणि महायुती सरकारकारचे दिड वर्षे याची तुलना आता मतदारांनी करायची आहे. एक रुपयात पीक विमा योजनेपासून ते आनंदाचा शिधा असे महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत.लखपती दिदि योजनेतून बचत गटानांही मोठा लाभ होणारआहे. दूध उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर ४० कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान जिल्ह्यातील २ लाख ६५ हजार शेतक-यांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहीतीही त्यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...