मुंबई / नगर सह्याद्री : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार केला. यामध्ये शहर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले.
या प्रकरणानंतर विरोधकांनी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल अशी घोषणाच फडणवीस यांनी केलीये.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे ते म्हणाले. एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होईल. या प्रकरणातील तिघा आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर याना ताब्यात घेतले असून आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड इतर दोन फरार आहेत.