spot_img
ब्रेकिंगभाजपाने दिली विशाल अंभोरेंना मोठी जबाबदारी, तर रुपेश हरकल यांची युवा मोर्चाच्या...

भाजपाने दिली विशाल अंभोरेंना मोठी जबाबदारी, तर रुपेश हरकल यांची युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी निवड

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
भाजपचे जेष्ठ नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर भाजप कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या नव्या कार्यकारिणीत सामाजिक कार्यकर्ते विशाल अंभोरे यांची शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आरंभ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रुपेश हरकल यांची युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शहर भाजप कार्यकारिणी निवडीला अखेर श्रावण महिन्यात मुहूर्त लाभला आहे. या कार्यकारणी मध्ये सरचिटणीस-२, उपाध्यक्ष ११, चिटणीस ६, कोषाध्यक्ष-१, कार्यकारणी सदस्य ५४, कायम निमंत्रित सदस्य – १५ तसेच विविध मोर्चा, आघाडी सेल, आघाडी व प्रकोष्ठ यांचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे.

या नव्या कार्यकारिणीत नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, प्रदेश सरचिटणीस मा. विजयभाऊ चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितिनजी दिनकर यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वाळू तस्करीतून पारनेरमध्ये गुन्हेगारीचा कहर; पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टनरशिप?

भ्रष्ट पोलिसांच्या आश्रयाने गुन्हेगार बिनधास्त! वाळू तस्करीच्या वादात युवकाला मारहाण, फक्त एकाला अटक; पोलिसांची...

हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी

आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड नगर सह्याद्री वेब टीम - आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा...

बंदुकीच्या धाकाने पत्नीला मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेलजवळ राहणाऱ्या स्नेहल निखिल शेकडे...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; कारण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने काम...