spot_img
ब्रेकिंगबाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावर मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावर मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित गटात प्रवेश केलेल्या बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील बांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसबाहेर ही घटना घडली आहे. या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर एक आरोपी आता फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची पथके रवाना केली आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या गोळीबार झालेली दुर्देवी घटना आहे. पोलिसांना प्रकरणात कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गँगवार डोकं वर काढता कामा नये. तीन आरोंमधील दोघांना पकडले असून एक आरोपी हरियाणा आणि एक उत्तर प्रदेशमधील आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बाबा सिद्दिकी यांना गोळीबारानंतर लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार हे लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत.

बाबा सिद्दिकी यांची सुपारी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती. तिन्ही आरोपी पुण्यातून आले होते, मात्र यांना कोणी बोलावलं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामधील एका आरोपीचे नाव शिवा असं असून य हत्येमागे एक मोठा गँगस्टर असल्याचं माहिती समोर येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...