spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून...

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली. या हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात त्यांच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते रुग्णालयात दाखल होत आहेत. अभिनेता संजय दत्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली आहे.

कोण होते बाबा सिद्दीकी?
बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ व २००९ मध्ये असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची पक्षाने संधी दिली होती. अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो, की विशेष चर्चा असा मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिश्यान सिद्दीकी याला मतदंरसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार रोहित पवारांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल; वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून मोठी...

अर्बन बँक घोटाळा प्रकरणात ‘ईडी’ ची एन्ट्री; चौकशी करणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटी रूपयांच्या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी...

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...