Maharashtra Rain Update: महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातील काही भागांना या पावसाचा मोठा फटकाही बसला आहे. काही ठिकाणी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशातच हवामान विभागाने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा दिला आहे.
दक्षिण तेलंगण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चक्राकार वारे वाहत असल्याची माहिती आहे. याशिवाय तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याची माहिती आहे. परिणामी महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरण आहे. याशिवाय मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळत पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यात या भागात गारपाटीची शक्यता?
आत पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, जालना, बीड याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबत गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळं या भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणातील मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, कोल्हापूर, नंदूरबार, सांगली, सोलापूर या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.