छत्तीसगड / नगर सहयाद्री : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निधन झालं आहे. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने त्यांचं निधन झालं ते 77 वर्षाचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकमध्ये झाला.
दिगंबर जैन आचार्य (दार्शनिक साधू) होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केलं.
आज पंचतत्वात होणार लीन
जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. मध्यरात्री 2.30 वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचं निधन झालं आहे. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रम्हलीन झाले. आज ते पंचतत्वात विलीन करण्यात येईल.