spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! मनोज जरांगे पाटील फिरले माघारी! नेमकं कारण काय?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील फिरले माघारी! नेमकं कारण काय?

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
प्रशासनाने अंबड तालुक्यात थेट संचारबंदीचे आदेश काढले असून त्यांच्या कट्टर समर्थकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील एकाही मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून पुन्हा आंतरवाली सराटीच्या दिशेने माघारी फिरले आहे.

रविवार दि, २५ रोजी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीतर देवेंद्र फडणवीस चालवत आहे. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असल्याचे देखील म्हटले होते.

दरम्यान मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता आंतरवालीत जाऊन चर्चा करू त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे म्हणत माघारी फिरले असून सर्व मराठा बांधवानी संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.

अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक ताब्यात
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असा इशाराही दिला होता. त्यानंतर सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक पोलीस पथक जालन्यात धडकले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक श्रीराम कुरणकर, शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे यांना ताब्यात घेतले आहे.

अंबड तालुक्यात एसटी बस पेटवली
मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहे. पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...