spot_img
महाराष्ट्रMaratha Reservation : मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची मागणी फेटाळली,...

Maratha Reservation : मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची मागणी फेटाळली, नेमकं काय घडलंय ? पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंबंधी आंदोलन सुरु असतानाच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलेली मागणी फेटाळली आहे.

‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ असं मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे. अशी माहिती शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दिलीये. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बैठक संपल्यानंतर जयंत पाटील बाहेर आले. त्यावेळी त्यांना बैठकीत काय चर्चा झाली? काय ठरलं? असं विचारण्यात आलं. “काहीही घडलेलं नाही, आहे तीच परिस्थिती आहे. फक्त शांतता राखा, उपोषण मागे घ्या हा ठराव एकमुखाने या सर्वपक्षीय बैठकीत झाला” असं जयंत पाटील म्हणाले. कुणबीमधून मराठा समाजाला ससकट आरक्षण देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याच जयंत पाटील म्हणाले. आरक्षणासाठी आयोग काम करतोय, असं जयंत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय आहे म्हणणं !
मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्या, असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, सहकार्य करावे. “आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सहकार्य करा, सकल मराठा समाजाने सहकार्य करावे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...