spot_img
ब्रेकिंगमंत्री आदिती तटकरेंची मोठी माहिती; 'या' लाडक्या बहिणींचा हप्ता बंद?

मंत्री आदिती तटकरेंची मोठी माहिती; ‘या’ लाडक्या बहिणींचा हप्ता बंद?

spot_img

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, एप्रिल महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत तरीही या योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना आतापासून १५०० रुपये मिळणार नाहीत. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी माध्यमांसमोर याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की,काही रिपोर्टनुसार ७ लाखांपेक्षा जास्त महिला या इतर योजनांचा लाभ घेतल आहेत. लाडकी बहीण योजनेत १५०० रुपये दिले जातात. जर महिला या इतर योजनेअंतर्गत १५०० रुपयांचा लाभ घेत असतील. तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

तसेच जर दुसऱ्या योजनांमध्ये महिलांना १५०० पेक्षा कमी रुपये दिले जात असतील तर उरलेले पैसे या योजनेअंतर्गत दिले जातील. नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना १००० रुपये दिले जातात. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेत फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आदिती तटकरेंना लाडकी बहीण योजनेचा हप्ता का उशिरा येतो असा प्रश्न विचारला गेल्या. त्यावर त्या म्हणाल्या की, आमची टीम ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. बँकेची काही कागदपत्रे, आधार लिंक याबाबत काही समस्या आहेत. काही महिलांना पैसे देण्यात आले आहेत. काही महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत. त्यांना लवकरात लवकर पैसे मिळतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कांदा खरेदीत मोठा घोटाळा ! ‘या’ कंपन्यांची चौकशी करा, कोणी केली मागणी?

श्रीगोंदा | नगर सह्याद्री कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेड व एनसीसीएफ मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत...

अनेक इच्छुकांचा हिरमोड पारनेर तालुक्यातील ‘या’ ५८ ग्रामपंचायतीत येणार ‘महिलाराज’

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, राळेगण थेरपाळ, ढोकी, जवळा, राळेगणसिद्धी,...

पाणी पुरवठा सुरळित करा अन्यथा जल आंदोलन करणार; कोणी दिला इशारा?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नागरिकांना पाणीपट्टी भरमसाठ आकारण्यात आली आहे. मग त्यांना सुरळीत पाणीपुरवठा केला...

सेवानिवृत्त पोलिसाची 77 लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं? वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय भजनराव सांगळे (वय...