spot_img
महाराष्ट्रभाजपची मोठी खेळी ! राहुल नार्वेकर यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार, 'हे'...

भाजपची मोठी खेळी ! राहुल नार्वेकर यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार, ‘हे’ आहे कारण

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री : लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडूनही जय्यत तयारी सुरू असून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात भाजपाने कंबर कसून तयारी केली असून एक मोठी खेळी केली आहे. दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याची भाजपची तयारी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्वेकर यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश मिळाले आहेत. अरविंद सावंत यांच्याविरोधात नार्वेकर मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी उच्च वर्गीय आणि मुस्लिम नागरिकांचं प्राबल्य आहे. या भागात मराठी उमेदवार अनेकवेळा निवडून आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सध्या इथले खासदार आहेत. आणि त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याचं समोर येत आहे. राहुल नार्वेकर हे कोकणी , मराठी चेहरा आहे. त्यामुळे त्यांना या भागात निवडणुकीसाठी उतरवण्यास भाजप सज्ज झालं आहे. त्या अनुषंगाने नार्वेकर यांनी अनेक कार्यक्रमासही सुरूवात केली आहे. दक्षिण मुंबईचा हा मतदारसंघ घेण्यासाठी भाजपतर्फेही विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; ८ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Accident News: शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातामध्ये ८ जणांचा...

पावसाचा रेड अलर्ट! ‘या’ जिल्ह्यांना धोका

Rain update: एप्रिल महिना सुरू असूनही राज्यात उन्हाऐवजी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे....

सभापती राम शिंदे यांना धक्का!; ‘ते’ पद राष्ट्रवादीच्या ताब्यात

जामखेड । नगर सहयाद्री:- कवडगाव-गिरवली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडचे...

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

मुंबई । नगर सहयाद्री भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णअध्याय आज संपला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि...