spot_img
ब्रेकिंगराजकीय वर्तुळात चर्चांना उधाण! दादा, ताई आणि युवराजांची भेट, नेमकं कारण काय?

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण! दादा, ताई आणि युवराजांची भेट, नेमकं कारण काय?

spot_img

पुणे। नगर सह्याद्री-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पुण्यात झाली. बैठीकाला शरद पवार गटाचे नेते रोहित पवार, राजेश टोपे, सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजकीय पटलावर रोहित पवारांनी अजितदादांना धारेवर धरले आहे. अजित पवार यांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देत असताना कालवा समिती बैठकीनिमित्त रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली आहे.

उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईबाबत महत्वाची बैठक होती. यासाठी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, आ. राजेश टोपे, आ. शहाजी बापू पाटील, आ. रवींद्र धंगेकर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता ते सातत्याने वयाचा उल्लेख करत शरद पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याबाबत स्वत: शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून उत्तर दिले जात नाही. आ. रोहित पवार प्रचंड आक्रमक होत आहेत. शरद पवार गटाच्या मंचर येथील सभेवेळी ’वादा तोच, दादा नवा’ असे बॅनर रोहित पवार समर्थकांनी झळकवले.

आ. रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात कुकडी प्रकल्पातील पाणी सोडावे ही मागणी अजित पवारांनी मान्य केली आहे. त्यासोबत उजनी धरणातील पाण्याचा वापर करणार्‍या शेतकर्‍यांना सहापट पाणी पट्टी भरावी लागत आहे. इतर विविध पाण्याच्या प्रश्नांवर माझे बोलणे झाले. यंदा पंचवीस वर्षातील सर्वात कमी पाऊस पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झाला. तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीलाही पाणी मिळणार आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडली जाणार असून पहिले आवर्तन ३ मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती आ. राहुल कुल यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले पहा…

सोलापूर / नगर सह्याद्री - Gopichand Padalkar | Sharad Pawar : ईव्हीएम मशीनच्या विरोधात...

वकिल दांम्पत्य खून प्रकरण; पाच जणांनी रचला ‘ईतक्या’ लाखांसाठी कट; साक्षीदाराने सांगितली आपबीती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲड....

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात मोर्चा

आ. अमोल खताळ, आ.सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांची उपस्थिती  संगमनेर | नगर सह्याद्री बांगलादेशात काही महिन्यांपासून...

अहिल्यानगर: दहशत कायम! 3 बिबट्यांनी शिकार केली; शेतातील..

जामखेड | नगर सह्याद्री जामखेड शहराचे उपनगर असलेल्या भुतवडा परिसरात बिबट्यांनी गायीवर हल्ला केला असून...