spot_img
ब्रेकिंग'खा.विखे यांच्या माध्यमातून विकासासाठी मोठा निधी'

‘खा.विखे यांच्या माध्यमातून विकासासाठी मोठा निधी’

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्पना पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ सुजय विखे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी वस्तीवर तसेच ग्रामीण भागात मोठा निधी उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी सभापती काशिनाथ दाते यांनी केले.

अळकुटी येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून ३३ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, युवा नेते सचिन वराळ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, सरपंच चित्राताई वराळ, राहुल गाडगे, माजी सरपंच भाऊसाहेब डेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती दाते सर बोलत होते.

राहुल शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी खासदारांच्या वतीने महिला बचत गटांना वेगवेगळ्या फूड प्रोसेसिंग साहित्याचे वितरण करण्यात येत असुन प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी बचत गटांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगीतले. यावेळी सचिन वराळ पाटील म्हणाले, गेली पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करताना जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देउन विखे पाटील यांनी विकासकामांची गंगोत्री देण्याचे मोठे काम केले आहे म्हणून हा जिल्हा परिषद गट विकास कामांमध्ये स्वयंपुर्ण झाला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचा विकास करताना जिल्हा विकासमय केला असून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनाच विक्रमी मताधिक्याने विजयी करील असा विश्वास वराळ पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी खरेदी विक्री चे संचालक संग्राम पावडे, उपसरपंच शरद घोलप, माजी उपसरपंच आरिफ पटेल, सदस्य लता घोलप, माजी सरपंच निवृत्ती चौधरी, सदस्य रविंद्र गायकवाड, संचालक डॉ. बाबुराव म्हस्के, माजी सरपंच अशोक शेळके, बाबाजी येवले, उपसरपंच बाळासाहेब धोत्रे, भाजपचे सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार व मान्यवर उपस्थिती होते. याप्रसंगी सोनाली सालके यांनी महिला सबलीकरण करण्यासंदर्भात आपली मते मांडली. किसन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम घोलप यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब धोत्रे यांनी आभार मानले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...