spot_img
अहमदनगर'खादी ग्रामोद्योगच्या चेअरमनपदी हसन राजे' व्हा. चेअरमनपदी 'यांची' निवड

‘खादी ग्रामोद्योगच्या चेअरमनपदी हसन राजे’ व्हा. चेअरमनपदी ‘यांची’ निवड

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी हसनशेठ राजे तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र करंदीकर यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली.

आमदार नीलेश लंके यांच्या शिष्टाईनंतर संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी गुरूवारी दि. २९ रोजी संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीत चेअरमनपदासाठी हसन राजे तर व्हाईस चेअरमनपदासाठी राजेंद्र करंदीकर यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या विहीत मुदतीत राजे व करंदीकर यांचेच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहिर केले.

बैठकीस नवनिर्वाचित चेअरमन हसन राजे, व्हाईस चेअरमन राजेंद्र करंदीकर, संचालक अण्णा खैरे, ईश्वर पठारे, ॠषीकेश बोरूडे, राजू पांढरे, नीलेश खोडदे, भाऊसाहेब रासकर, अमित जाधव, सारीका देशमुख, शोभा शेलार उपस्थित होते. निवडीनंतर दोन्ही पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. बिनविरोध निवडीबद्दल राजे व करंदीकर यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ईश्वरी तुपे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक...

शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य मोठे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य...

दगाफटका केल्यास सरकारचा कार्यक्रमच लावणार; जरांगे पाटील काय म्हणाले पहा…

बीड / नगर सह्याद्री - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच...

शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाईन फसवणूक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून...