ओबीसी समाजाच्या हितासाठी जगताप यांना मताधिक्याने निवडून द्यावे -कल्याण आखाडे
अहमदनगर / नगर सह्याद्री –
महायुती सरकारने ओबीसी घटकांना न्याय दिला आहे. ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहून महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आणावे. ओबीसी समाजाचे मतदान हे निर्णायक आहे. ओबीसी समाजाच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी (अजित पवार गट) ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष तथा संत सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले.
शहरात नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाज बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना आखाडे बोलत होते. याप्रसंगी प्रा.माणिक विधाते, माजी नगरसेविका शितलताई जगताप, गवळी समाजाचे प्रतिनिधी प्रकाश भागानागरे, सकल माळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, वंजारी समाजाचे प्रतिनिधी आनंद लहामगे, अनिल निकम, राष्ट्रवादी ओबीसीचे जिल्हाध्यक्ष डी.आर. शेंडगे, नाभिक समाजाचे प्रतिनिधी नंदकुमार मोरे, धनगर समाजाचे प्रतिनिधी काका शेळके, चर्मकार संघाचे संजय खामकर, शहर ओबीसीचे अध्यक्ष अमित खामकर, विनायक गाडेकर, अनिल इवळे, विकास मदने, मारुती पवार, उमेश धोंडे, भरत गारुडकर, रोहित इवळे, मयूर जाधव, गणेश पांढरे, अथर्व राऊत, रोहित पडोळे, प्रथमेश रोकडे, तुषार टाक, अभिजीत ढाकणे, अनिकेत येमूल, अथर्व रेखी, आयुष चव्हाण, मयूर जाधव, अभिषेक चिपाडे, नारायण चिपाडे आदींसह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आखाडे म्हणाले की, महायुती सरकारने परीट समाजासाठी गाडगे महाराज महामंडळ, तेली समाजासाठी, संताजी जगनाडे महाराज महामंडळ, सुवर्णकार समाजासाठी, लिंगायत वाणी समाजासाठी, कोळी समाजासाठी, रामोशी समाजासाठी, नाभिक समाजासाठी, जैन समाजासाठी ओबीसी महामंडळांची स्थापना करून ओबीसी समाजाला न्याय दिला आहे. तसेच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यात 72 वस्तीगृहे सुरु केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीला उपस्थित असलेले सर्व ओबीसी समाजबांधवांनी शहर आणि समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी महायुतीचे उमेदवार आ. जगताप यांना पाठिंबा दर्शवून, त्यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.