spot_img
अहमदनगरभरधाव ट्रॅव्हल्सची वॅग्नर कारला धडक! दोन वर्षांची चिमुकली ठार

भरधाव ट्रॅव्हल्सची वॅग्नर कारला धडक! दोन वर्षांची चिमुकली ठार

spot_img

Accident News: पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाजवळ रविवारी (दि.६ ऑक्टोबर) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि कारची जोरदार धडक झाली. अपघातामध्ये कारमधील दोन वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. शुभांगी अभिजीत शिरसाठ (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

रविवार दि. ६ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डीकडून नगरकडे जात वॅग्नर कारला समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल बसने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये दोन वर्ष वयाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...