spot_img
ब्रेकिंगसावधान! दिवाळीतील हवा प्रदूषणामुळे 'या' आजारात वाढ

सावधान! दिवाळीतील हवा प्रदूषणामुळे ‘या’ आजारात वाढ

spot_img

पुणे | नगर सह्याद्री

वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकला आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता विषाणूजन्य (व्हायरल) न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे.

दिवाळीतील हवा प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजार वाढल्याचा अंदाज डॉटरांनी व्यक्त केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चढउतार होत आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे डॉटरांनी सांगितले.

दरवर्षी हिवाळ्यात न्यूमोनियाचे रुग्ण आढळून येतात. यंदा मात्र, न्यूमोनियाच्या रुग्णांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण डॉटरांनी नोंदविले आहे.

सध्या बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासारखी स्थिती नाही. मात्र, मधुमेह, हृदयविकार, वजन जास्त असलेले, ज्येष्ठ नागरिकांना उपचारांसाठी दाखल करावे लागत आहे. न्यूमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार असून, विषाणू, जीवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुप्फुसांत संसर्ग होतो.

ससून रुग्णालयातील श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड म्हणाले, गेल्या आठवड्यापासून न्यूमोनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून येत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चोंडीत कोंडीच!, राम शिंदे सरांनी मारली बाजी!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- थोरल्या पवारांचा नातू म्हणून ओळख राहिलेल्या कर्जत- जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित...

चौंडीतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ 10 मोठे निर्णय; वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या...

धारदार शस्राने तरुणावर सपासप वार; नगरमधील घटना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- किरकोळ वादातून टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यात...

आ. विक्रम पाचपुते यांना न्यायालयाचे पकड वॉरंट; कारण काय?

अहिल्यानगर । मगर सहयाद्री:- श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि साईकृपा शुगर ॲण्ड अलाईड लिमिटेड,...