पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी हसनशेठ राजे तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र करंदीकर यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली.
आमदार नीलेश लंके यांच्या शिष्टाईनंतर संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी गुरूवारी दि. २९ रोजी संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीत चेअरमनपदासाठी हसन राजे तर व्हाईस चेअरमनपदासाठी राजेंद्र करंदीकर यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या विहीत मुदतीत राजे व करंदीकर यांचेच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहिर केले.
बैठकीस नवनिर्वाचित चेअरमन हसन राजे, व्हाईस चेअरमन राजेंद्र करंदीकर, संचालक अण्णा खैरे, ईश्वर पठारे, ॠषीकेश बोरूडे, राजू पांढरे, नीलेश खोडदे, भाऊसाहेब रासकर, अमित जाधव, सारीका देशमुख, शोभा शेलार उपस्थित होते. निवडीनंतर दोन्ही पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. बिनविरोध निवडीबद्दल राजे व करंदीकर यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.