spot_img
अहमदनगररस्त्याच्या वादातून सावत्र आईला मारहाण? मुलासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

रस्त्याच्या वादातून सावत्र आईला मारहाण? मुलासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
सामाईक रस्त्यावरून सावत्र आई व कुटुंबाला मारहाण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे घडली. याबाबत सहाजणांवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आशाबाई शहाजी राक्षे (वय ६५ वर्षे, रा गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे, तर सुभाष शहाजी राक्षे, अदित्य सुभाष राक्षे, भाग्याश्री सुभाष राक्षे, वैभव सुभाष राक्षे, संपत भागा पावडे, आलम खान (सर्व रा. गव्हाणवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी या मुलगा संतोष, सून व दोन नातवांसह राहतात. शेजारी त्यांचा सावत्र मुलगा सुभाष शहाजी राक्षे हा कुटुंबासह राहतो. या दोघांमध्ये जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या कारणावरुन नेहमी वाद होतात. दि. ६ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी या रस्त्यावरून आपल्या किराणा दुकानात जात असताना आरोपी व इतर दोघे अनोळखी लोक रस्त्यावर उभे होते. त्यावेळी आदित्य राक्षे हा फिर्यादीला म्हणाला की ही जागा आमची आहे. येथून तू व तुझ्या घरच्यांनी कोणी जायचे नाही. त्यावेळी त्याला हा रस्ता सामाईक आहे असे म्हणल्याचा राग येऊन आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

ओरडण्याच्या आवाजाने सून बाहेर येऊन विचारपूस करीत असताना तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व दोघींना शिवीगाळ केली. सुनेने पती संतोषला फोनवरून कळविल्यावर तो वाहनाने आला व माझ्या आईला का मारले असे विचारताच त्याला कोयता, रॉडने मारहाण केली. तसेच फिर्यादी व सून सोडवासोडव करीत असताना भाग्याश्री राक्षे हिने केस पकडून जमिनीवर आपटले.

वैभव राक्षे याने हातातील हातोड्याने व संपत पावडे याने लोखंडी गजाने वाहनाची मागील काच फोडली. त्यानंतर फिर्याद देण्यासाठी तिघे पोलीस ठाण्यात आले असता नातू प्रणव राक्षे याला घराच्या पोर्चमध्ये आदित्यने लोखंडी गजाने मारहाण करुन त्याचा गळा दाबून जीवे मारण्याचे धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून सहाजणांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...