spot_img
राजकारणबावनकुळेंची फजिती ! महाविजय यात्रेत महिलेला पंतप्रधान कोण होणार असं विचारलं, महिला...

बावनकुळेंची फजिती ! महाविजय यात्रेत महिलेला पंतप्रधान कोण होणार असं विचारलं, महिला महागाईवर संतापली, अन बावनकुळेंनी सावरासावरी केली

spot_img

वर्धा / नगर सह्याद्री :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. त्यावेळी लोकांच्या मनात भावी पंतप्रधान कोण हे जाणून घेण्याचा ही त्यांचा प्रयत्न असतो. भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प यात्रेनिमित्त चंद्रशेखर बावनकुळे वर्धा जिल्ह्यात आले होते. येथील स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा एका महिलेला २०२४ मध्ये पंतप्रधान कोण व्हावे असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न विचारला. त्यावेळी, महिलेच्या उत्तराने बावनकुळे यांची दुसऱ्यांदा फजिती झाली.

मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासकामांचा आणि योजनांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवण्याचं काम सुरू आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री जनतेत मिसळून लोकसंपर्कातून मोदींचा प्रचार करत आहेत.
वर्धा शहरातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंतच्या यात्रेदरम्यान महिलांना २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

त्यावर वर्ध्यातील महिलेने महागाईवरुन संताप व्यक्त केला. महिलेची भावना लक्षात येताच बावनकुळे यांनी महिलेसमोर धरलेला माईक खाली घेतला. या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये, महिलेने वाढत्या महागाईवर भाष्य करत संताप व्यक्त केल्याचं दिसून येते. सरकार विजेचे बिल वाढवून देतं, सिलेंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का?, असा थेट सवाल महिलेनं यावेळी विचारला. त्यावर, आपण स्टेजवर बोलू, तुम्ही स्टेजवर चला, असे म्हणत बावनकुळे यांनी प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला.

असाच प्रसंग रत्नागिरीतही झाला होता. भाजपाच्या विकासकामांची आणि सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत असताना रत्नागिरीमध्ये त्यांनी रस्त्यावर उतरुन जनतेशी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी, काहींना आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण होईल, असा प्रश्न केला. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान कोण व्हावं, असं तुम्हाल वाटतं, असा सवाल बावनकुळे यांनी केला होता. त्यावर, एका युवकाने राहुल गांधींचं नाव घेतलं. तरुणाने राहुल गांधींचं नाव घेतल्याने भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...