spot_img
राजकारणमराठा आरक्षणात अमित शहा लक्ष घालणार ! फडणवीस, बावनकुळेंना दिल्लीत बोलवलं

मराठा आरक्षणात अमित शहा लक्ष घालणार ! फडणवीस, बावनकुळेंना दिल्लीत बोलवलं

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राज्यात मराठा आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील आता धसका घेतला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांसह विरोधातील आमदारांनी देखील आता आंदोलनास पाठिंबा देण्यास सुरवात केली आहे.

भाजप खासदारांनी देखील राजीनामे दिले आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ बैठक, राजकीय चर्चा यांचा काहीच परिणाम होत नसल्याने आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर याबाबत हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे.आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ऍक्टिव्ह होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीत आज बोलवलंय.

ते दोघेही दिल्लीतील निवासस्थानी दुपारी ३.३० वाजता पोहोचणार आहेत. यांच्यामध्ये आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होईल अशी माहिती समोर येत आहे. मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीला बोलावलं. आता मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना काही सूचना देतात का? की ते स्वतः यात काही निर्णय घेतील एके लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...