spot_img
अहमदनगरश्रीरामपुरात झळकले राजकीय टोमण्यांचे बॅनर्स; भाजप शहराचा सेनापती बदलणार का?

श्रीरामपुरात झळकले राजकीय टोमण्यांचे बॅनर्स; भाजप शहराचा सेनापती बदलणार का?

spot_img

श्रीरामपूर | नगर सहयाद्री 
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. श्रीरामपूर शहरात देखील आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती आखली जात आहे. बहुचर्चित भाजप तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या निवडी अखेर जाहीर झाल्या. परंतु निवडीमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडी अमान्य असून त्यांनी नाराजी व्यक्त करत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपचे श्रेष्ठी हे श्रीरामपूर शहरासह तालुक्याचा सेनापती बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाच्या निवडीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू होती. शुक्रवार 28 मार्च रोजी श्रीरामपूरमधील शासकीय विश्रामगृह येथे भाजप तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतींमध्ये तालुका आणि शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन आपली दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही पदांसाठी कुणाची वण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर रविवार 20 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाची नावे जाहीर करण्यात आली. परंतु ज्यांनी मुलाखती दिल्या नव्हत्या, त्यांचीच नावे या पदासाठी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला. अनेकांनी या निवडीला विरोध करत या निवडी नियमबाह्य असल्याचा आरोप देखील केला. तुमच्या सर्व मागण्या आणि नाराजीचं निवेदन आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवू, असं आश्वासन निवडणूक प्रमुखांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ याबाबत काय निर्णय घेणार यांच्याकडे कार्यकर्त्यांची लक्ष लागले आहे.

पक्षातील अंतर्गत वाद उफाळला
पक्षाच्या निवडी जाहीर झाल्यानंतर श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आली आहे. पक्षांंतर्गत मोठी दुफळी जाहीरपणे समोर आली आहे. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडी नियमबाह्य असून या आम्हाला मान्य नाहीत. तुम्हाला निवडी जाहीर करायच्या होत्या तर मुलाखती का घेतल्या? असा प्रश्न देखील कार्यकर्ते उपस्थित करत आहे. त्यामुळेच नाराजी व्यक्त करत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपच्या निवडी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

श्रीरामपुरमधील बॅनर्स चर्चेत
भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर शहरातील राम मंदिर चौकात राजकीय टोमण्यांचे बॅनर्स झळकले. बॅनरवर झन झन कि सुनो झनकार ए पैसा बोलता है! फोर्च्यूनर गाडी आणि पैसे असेल तरच भाजप अध्यक्ष होता येईल. दूध भेसळ घोटाळ्याचा गुन्हेगार पाहिजे. बूथप्रमुख व पक्षसदस्य न केलेला असला तरी चालेल. डीएनए काँग्रेसचाच असला पाहिजे. अध्यक्ष निवडीसाठी मुलाखत न दिलेला असला तरी चालेल. पैसे असेल तर 45 वयाची अट शिथिल केली जाईल. तो भाजप सदस्य नसला तरी चालेल. अशा अटी, शत अध्यक्षपदासाठी आहेत, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...