spot_img
आर्थिकBank FD : आता FD वर मिळेल 9% पर्यंत व्याज ! पहा...

Bank FD : आता FD वर मिळेल 9% पर्यंत व्याज ! पहा कोणत्या बँकेत किती व्याज

spot_img

नगर सहयाद्री टीम : एफडी ही अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. परंतु अनेक वेळा कमी रिटर्न असल्याच्या कारणास्तव लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात. आज आम्ही तुम्हाला अशा अनेक बँकांच्या मुदत ठेवींबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना जास्त व्याजदराचा लाभ देतात. स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना 8 ते 8.5 टक्के व्याज देत आहेत. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बँकांचे व्याजदरही तपासून पहा.

एयू स्मॉल फायनान्स बँक
AU Small Finance Bank 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 3.75% ते 8% दराने व्याज देत आहे. याशिवाय, 18 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 8% च्या विक्रमी दराने व्याज उपलब्ध आहे. 24 जानेवारी 2024 पासून दर लागू आहेत.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवीच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 3.5% ते 8.50% पर्यंत व्याजदर देते. याशिवाय, बँक 444 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 8.50% इतका विक्रमी व्याज दर देत आहे. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत.

ESAF स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 4% ते 8.25% पर्यंत FD वर व्याज देते. दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर झालेल्या एफडीवर 8.25% विक्रमी व्याजदर दिला जात आहे. हे FD व्याजदर 1 जानेवारी 2024 पासून लागू आहेत.

टीप : ही माहिती ज्ञानावर आधारित असून गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...