spot_img
देशअयोध्येचे मंदिर भक्तांसाठी खुले!! दोन सत्रात दर्शन तर आरतीसाठी 'अशी' करा बुकिंग

अयोध्येचे मंदिर भक्तांसाठी खुले!! दोन सत्रात दर्शन तर आरतीसाठी ‘अशी’ करा बुकिंग

spot_img

अयोध्या। नगर सहयाद्री
श्रीरामाचे सोमवारी अयोध्या नगरीत आगमन झाले. तो बहुप्रतीक्षित अभिषेक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात हा सोहळा सोमवारी दुपारी १२.५० च्या वाजताच्या मुहूर्तावर झाला. त्यानंतर प्रभू रामचंद्रांचे ‘याचि देहि याचि डोळा’ दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महासागर उसळला आहे. मंगळवारपासून हे मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

५१ इंच उंचीच्या सजवलेल्या सावळ्या राममूर्तीचे दर्शन होताच रामनामाचा जयघोष केला जात आहे. मंगळवारपासून भव्य राम मंदिर सर्वसामान्य भक्तांना दर्शनासाठी खुले केले आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अयोध्येतील श्रीराम मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे. सकाळी सात ते ११.३० वाजेपर्यंत दर्शन खुले असणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रवेश मिळणार नाही. दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा हे मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे.

मंदिर सर्वांसाठी खुले होण्यापूर्वीच, म्हणजे पहाटे ६.३० वाजता याठिकाणी जागरण/श्रीनगर आरती होईल. या आरतीला केवळ त्यांनाच प्रवेश मिळेल ज्यांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले आहे. तसेच संध्या आरती सायंकाळी ७.३० वाजता असणार आहे. यासाठी देखील केवळ बुकिंग असणार्‍यांनाच प्रवेश दिला जाईल. पहाटेच्या जागरण आरतीसाठी भाविकांना आधीच्या दिवशी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करावे लागेल, किंवा आरतीच्या ३० मिनिटे आधी श्री राम जन्मभूमी कॅम्प ऑफिसमधून आरतीचा पास मिळवता येईल. संध्या आरतीसाठी तुम्ही आधीच्या दिवशी किंवा त्याच दिवशी बुकिंग करू शकता.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. बुकिंग करण्यासाठी तुमच्याजवळ अधिकृत सरकारी आयडी प्रूफ असणे गरजेचे आहे. याच वेबसाईटवर आरतीसाठी ऑनलाईन पासेस बुक करता येईल. विशेष म्हणजे, आरतीचे पासेस अगदी मोफत आहेत. यासाठी कोणत्याची प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुका मविआला अखेरची घरघर!; अनेकांचा कर्डिलेंशी घरोबा…

लंकेंच्या पराभवामुळे तालुक्यातील पुढार्‍यांनी साधली आमदार कर्डिलेंशी जवळीक सुनील चोभे | नगर सह्याद्री पंधरा...

राऊत साहेब, नगरमधील शिवसेना संपविल्याबद्दल अभिनंदन!; नगरमध्ये राठोडांचा विक्रम अन् गाडेंचा योगी…

सहकार पंढरीच्या जिल्ह्यातील शिवसेना संपली नव्हे संपवली | निवडणुका आल्या की बाळासाहेबांचे सैनिक लढणारे,...

…तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही; मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले पहा

बीड / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil on Dhananjay Munde: मस्साजोग गावचे सरपंच...

पालमंत्रीपदावरून रस्सीखेच; विखेंच ठरलं, अशी आहे संभाव्य पालमंत्र्यांची नाव

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याविषयी मोठ्या...